नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर (Modi gujrat visit) असून, ३० ऑक्टोबरला झालेल्या मोरबी ब्रिज अपघातामुळे (Morbi bridge accident) पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी मोरबी जिल्ह्याला भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे मोरबी शहरात विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. मोदी जखमींना रुग्णालयात जावून तर मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत.
Narendra Modi: पंतप्रधान मोदींची मोरबी जिल्ह्याला भेट, पूल दुर्घटनेचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर (Modi gujrat visit) असून, ३० ऑक्टोबरला झालेल्या मोरबी ब्रिज अपघातामुळे (Morbi bridge accident) पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
अचानक कार्यक्रमात बदल: रविवारी रात्री मोरबीमध्ये पूल कोसळून भीषण अपघात झाला. केवडियातील एकतानगरमधून पंतप्रधानांनी या घटनेवर शोक व्यक्त केला होता आणि मी जरी येथे आहे तरी माझे मन मात्र मोरबीमध्येच असल्याचे म्हटले होते. त्यांनी सर्व कुटुंबीय आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या. तीन दिवसांच्या या गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार होते. ते अनेक भूमिपूजन व शिलंन्यास कार्यक्रमांना उपस्थित राहणार होते. मात्पर मोरबीमध्ये अचानक घडलेल्या या दूर्घटनेमुळे पंतप्रधानांनी मोरबीला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.