नवी दिल्ली - आणीबाणीच्या काळात कोरोना लस वापरण्याचा परवाना फायजर कंपनीने मागितला आहे. भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाकडे एमर्जन्सी काळात लसीचा परवाना मागणारी फायजर ही पहिलीच कंपनी ठरली आहे. कंपनीला इंग्लड आणि बहारीन देशात असा परवाना मिळाल्यानंतर फायजर इंडियाने भारतातही यासाठी अर्ज दाखल केला आहे.
सीरमही करणार अर्ज दाखल
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनीही परवाना मागणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाल यांनी मोदींच्या व्हॅक्सिन दौऱ्यानंतर सांगितले. दोन आठवड्यांच्या आत अर्ज दाखल करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. कोविशिल्ड ही लस सीरम कंपनीकडून तयार करण्यात येत असून लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.