इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी राष्ट्रपतींना संसद विसर्जित करण्यासाठी ( Imran Khans Wrote Letter President ) पत्र लिहिले आहे. लोकशाही मार्गाने निवडणुका व्हाव्यात, असे ते म्हणाले आणि पाकिस्तानी जनतेला नव्याने निवडणुकीची ( Pakistan Parliament Dissolves ) तयारी करण्याचे आवाहन केले. दरम्यान, उपसभापतींनी अविश्वास ठराव फेटाळला आहे. वृत्तानुसार, विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
'परकीय कटाविरुद्ध शांततापूर्ण निदर्शने करा' -जुलै 2018 मध्ये निवडून आलेले इम्रान खान, अर्थव्यवस्था सुधारण्याचे आणि भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्याचे वचन दिले होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी गेल्या रविवारी इस्लामाबादमध्ये एक भव्य रॅली काढली आणि नंतर ते त्यांच्या समर्थकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे दाखवण्यासाठी वादग्रस्त भाषणे दिली. निर्णायक अविश्वास मतदानाच्या एक दिवस आधी, इम्रान खान यांनी देशातील तरुणांना त्यांच्या सरकारच्या विरोधात रचलेल्या कथित परकीय कटाविरुद्ध शांततापूर्ण निदर्शने करण्याचे आवाहन केले. त्यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर उद्याच्या मतदानासाठी त्यांच्याकडे एकाहून अधिक योजना आहेत. पाकिस्तानच्या तरुणांनी आंदोलन करून बाह्य शक्तींच्या षड्यंत्राविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. तसेच विरोधी पक्षांचे नेते त्यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सत्ता प्राप्तीच्या शोधात आहेत, असेही ते म्हणाले.