महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pakistani Drone in Amritsar : ड्रग्जची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन पुलमोरा सीमारेषेवर सुरक्षा जवानांनी पाडले

अमृसरमधील पुलमोरा येथे पाकिस्तानच्या ड्रोनला पाडण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

Pakistani Drone in Amritsar
पाडण्यात आलेले ड्रोन

By

Published : May 29, 2023, 10:18 AM IST

अमृतसर : सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या संशयित ड्रोनला पाडण्यात यश मिळवले. या ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी करण्यात येत असल्याचे उघड जाले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या ड्रोनला पाडून ड्रग्जची पाकीटे जप्त केली आहेत. ही घटना पंजाबमधील अमृतसर विमानतळाजवळील पुलमोरा येथे उघडकीस आली. दरम्यान सुरक्षा दलांनी या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.

रात्री आढळून आले संशयित पाकिस्तानी ड्रोन :अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रविवारी रात्री संशयित पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा रक्षकांना दिसून आले. सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत हे ड्रोन पाडले. या ड्रोनची झडती घेतली असता, त्यात ड्रग्जची तस्करी करण्याच येत असल्याचे उघड झाले. सुरक्षा दलाच्या जवानांनी या ड्रोनमधील ड्रग्जची पाकिटे जप्त केली आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसरात गस्त वाढवली आहे.

पुलमोरात आढळले पाकिस्तानी ड्रोन :पंजाबमधील अमृतसरमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळील बीओपी पुलमोरा येथे पाकिस्तानी ड्रोन पुन्हा दिसले. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. जवानांनी गोळीबार करून ड्रोन खाली पाडले. यानंतर जवानांकडून परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एक पाकीट जप्त करण्यात आले. ते उघडल्यानंतर या पाकिटात हेरॉईन असल्याचे दिसून आले. या ड्रग्जबाबतची माहिती सुरक्षा दलाचे जवान घेत असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सीमेपलीकडून ड्रग्जची तस्करी :पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करी होत आहेत. यासोबतच पाकिस्तानी दहशतवादी भारतात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने या ड्रोनच्या मदतीने शस्त्रे आणि ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत ड्रोनच्या मदतीने ड्रग्ज पाठवण्याचे प्रकार वाढले आहेत. आधुनिक ड्रोन मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. मात्र, सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. यापूर्वी 6 जानेवारीला पंजाबच्या फिरोजपूर सीमेजवळ हेरॉईनची मोठी खेप सापडली होती. हेरॉईन बटाट्याच्या शेतात लपवून ठेवले होते. त्यावेळी दाट धुक्याचा फायदा घेत हे कृत्य करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या वतीने देण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. वाळू माफियांची मुजोरी; जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर चालवला टिप्पर, घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी
  2. FIR On Wrestlers : जंतरमंतरवर आखाडा; ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हा, आंदोलकांचे तंबूही उखडले

ABOUT THE AUTHOR

...view details