नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एसपी बालसुब्रमण्यम, जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांसह सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यासह १० जणांना पद्मभूषण तर, १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
पद्म पुरस्कारांची यादी -
पद्मविभूषण -
पद्मभूषण -
पद्मश्री -
सिंधुताई सपकाळ (पद्मश्री) -
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने माईंनी अर्थात सिंधुताईंनी आपलेसे केले. आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल दऱ्यात वसतीगृह सुरू केले. आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. माईंना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे.