नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ( Opposition Meets In Delhi to Decide Presidential Candidate ) या बैठकीत सहभागी होण्यासाठी अनेक नेते पोहोचले आहेत.
Opposition Meeting In Delhi: दिल्लीत विरोधकांची बैठक; राष्ट्रपती उमेदवारावर चर्चा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत २२ राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. ( Opposition Meeting In Delhi ) मात्र, काही पक्षांचे नेते या बैठकीला गैरहजर आहेत. यामध्ये 18 पक्षांचेच नेते उपस्थित राहिले आहेत.
काँग्रेसमधून रणदीप सुरजेवाला, मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश पोहोचले आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशिवाय पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती या बैठकीला हजर आहेत. ( Presidential Candidate ) या बैठकीला 18 पक्षांचे नेते पोहोचले आहेत. ममता यांनी स्वतः गेटवर पोहोचून सर्व नेत्यांचे स्वागत केले.
या बैठकीत विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसह २२ विरोधी पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांच्या या बैठकीत आपचे निमंत्रक अरविंद केजरावील आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रकेशर राव या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.