महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आता अंत्यविधीसाठी ऑनलाईन बुकिंग; बंगळुरू महापालिकेचा निर्णय

बंगळुरु महानगर पालिका क्षेत्रात १८ स्मशानभूमीचा समावेश आहे. या सर्व स्मशानभूमीमध्ये आता अंत्यविधी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या माध्यमातून महापालिकेकडून मृतांच्या नातेवाईंकाकडून रुग्णवाहिका अथवा अंत्यविधीचा खर्च घेतला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

बंगळुरू महापालिकेचा निर्णय
बंगळुरू महापालिकेचा निर्णय

By

Published : May 15, 2021, 10:49 AM IST

बंगळुरू - कोरोना महामारी आणखी काणे कोण ते दिवस दाखवणार आहे माहित नाही, अशी परिस्थिती आज देशात पाहायला मिळत आहे. कोरोनावर उपचार घेण्यासाठी नंबर, लसीकरणासाठी नंबर हे चित्र पाहायला मिळत होतेच. मात्र, आता एखाद्या रुग्णाचा अथवा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीसाठी देखील नंबर लावावा लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. अंत्यविधीसाठी ऑनलाईन नंबर लावण्याचा निर्णय बृहन बंगळुरू महानगरपालिकेनने घेतला आहे.

अंत्यविधीची मोफत परंतु ऑनलाईन सेवा

बंगळुरु महानगर पालिका क्षेत्रात १८ स्मशानभूमीचा समावेश आहे. या सर्व स्मशानभूमीमध्ये आता अंत्यविधी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या माध्यमातून महापालिकेकडून मृतांच्या नातेवाईंकाकडून रुग्णवाहिका अथवा अंत्यविधीचा खर्च घेतला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

कशी असेल ही सुविधा-

बंगळुरू महापालिकेने सुरू केलेल्या या सुविधेचा वापर करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर 8495998495 प्रसिद्ध करण्यात आला आहे. 24 तास सेवा देणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधून मृताच्या अंत्यविधीची संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर अंत्यविधीची जागा आणि वेळ निश्चित केली जाईल. पुढे या अंत्यविधीसाठी एक टोकण क्रमांक दिला जाणार आहे. या हेल्पलाइन नंबरवर व्हॉट्सअॅपची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. एकदा नंबर बुक झाला की , अंत्यविधीपूर्वी अर्धातास आधी निश्चित करण्यात आलेल्या स्मशानात बोलवण्यात येईल.

का घेतला हा निर्णय-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कर्नाटकमध्येही महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज ३० ते ४० हजार रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. तर सुमारे ५०० जणांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यातील २५० मृत्यू बंगळुरू शहरातच नोंद होत आहेत. त्यामुळे स्मशानाबाहेर अंत्यविधीसाठी रांगा लागत आहेत. मात्र, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये काही तांत्रिक अडथळे येत आहेत. ते लवकरच सोडवले जातील, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details