महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Stock Market Rises : बजेटच्या पार्श्वभुमीवर शेअर मार्केट वधारले, दिवसभर चढ उतार पाहायला मिळणार

गेल्या काही दिवसांपासून शेअरमार्केटमध्ये सातत्याने चढउतार (The stock market fluctuates steadily) पहायला मिळत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) त्यांच्या कारकिर्दीतील चौथा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी निफ्टीमध्ये 239 ने वाढ होऊन 17,579 वर पोहचला आहे. तर सेन्सेक्स 852 ने वाढून 58,867 वर पोहचला आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात खूप चढ-उतार पाहायला मिळू शकते.

share market
शेअर मार्केट वधारले

By

Published : Feb 1, 2022, 10:41 AM IST

Updated : Feb 1, 2022, 1:10 PM IST

मुंबई: काल सकाळी शेअरबाजार सुरू होताच सेन्सेंक्समध्ये घसरण झाली होती. मात्र त्यानंतर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीत तेजी आली. सेन्सेक्स 58 हजारांच्या तर निफ्टी 17,500 चा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्स समभागांमध्ये टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, एसबीआय आणि पॉवरग्रिड हे प्रमुख वधारले. दुसरीकडे इंडसइंड बँक, कोटक बँक आणि एचयूएलचे नुकसान झाले. अर्थमंत्री निर्मला सितारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. शेअर बाजाराला देखील अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षेनुसार बजेट राहिल्यास या आठवड्यात शेअरबाजारातील घोडदौड कायम राहील. गेल्या दोन आठवड्यांपासून देशांतर्गत शेअर बाजारावर विक्रीचा दबाव आहे. मात्र, हा आठवडा बाजारासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होताना मुंबई शेअर बाजार 930 अंकांनी वाढला

सेन्सेक्स 930 ने वाढला 58944 वर

निफ्टी 252 ने वाढला 17592 वर

Last Updated : Feb 1, 2022, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details