नवी दिल्ली -कोरोनाने देशात थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढतच आहेत. यातच बंगाल निवडणुकीमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार करणारे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना महामारीत आघाडीवर नसल्याचे पाहायला मिळत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस नागेश करीयप्पा यांनी गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. बंगालच्या निवडणुकीदरम्यान ते हरवल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही कोरोना कालावधीत लोकांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून आहोत. सध्याचे सरकार आणि त्याच्या प्रमुख नेते गायब झाले आहेत. त्यामुळे आम्ही ते हरवले असल्याची तक्रारी नोंदवली आहे. आम्हाला आशा आहे की देशाचे गृहमंत्री लवकरच सापडतील आणि त्यानंतर ते आपले कर्तव्य पार पाडतील, असे नागेश करीयप्पा यांनी म्हटलं.
देश कोरोना साथीने झगडत आहे आणि देशातील प्रत्येक नागरिक संकटात सापडला आहे. त्यावेळी राजकारण्यांचे कर्तव्य आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षाशी विशेष न राहता संपूर्ण देशाला उत्तर देतील. परंतु जेव्हा देशातील जनतेला त्यांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा ते अदृश्य असतात, असे नागेश करीयप्पा यांनी म्हटलं आहे.