नवी दिल्ली : Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात Nomination for the post of Congress President आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने ही अधिसूचना जारी केली आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार अधिसूचना जारी झाल्यानंतर आता 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.
अधिसूचना जारी होण्याच्या एक दिवस अगोदर बुधवारी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 22 वर्षांनंतर काँग्रेसचे अध्यक्षपद निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
गेहलोत म्हणाले की, मला पक्षाचा निर्णय मान्य असेल, पण त्याआधी राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याचा शेवटचा प्रयत्न करू. दुसरीकडे, लोकसभा सदस्य थरूर, जे आधीच निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देत आहेत. त्यांनी बुधवारी काँग्रेस मुख्यालय गाठले आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांची भेट घेतली आणि उमेदवारी प्रक्रियेची माहिती घेतली. अन्य काही नेतेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.