महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 16, 2020, 4:48 PM IST

Updated : Nov 16, 2020, 7:50 PM IST

ETV Bharat / bharat

नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार  शपथविधी न्यूज
नितीश कुमार शपथविधी न्यूज

17:17 November 16

भारतीय जनता पक्षाचे नेते मंगल पांडे आणि अमरेंद्र प्रताप सिंह यांनी बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

17:10 November 16

हिंदुस्तानी आम मोर्चाचे (एचएएम) प्रमुख जीतन मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) चे मुकेश सहनी यांनी बिहारचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

16:58 November 16

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवा लाल चौधरी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

16:52 November 16

भारतीय जनता पक्षाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

16:50 November 16

नितीश कुमार 7 वेळा झाले मुख्यमंत्री -

3 मार्च 2000 रोजी 29 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

नोव्हेंबर 2005 मध्ये 31 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

नोव्हेंबर 2010 मध्ये 32 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

फेब्रुवारी 2015 मध्ये 34 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

नोव्हेंबर 2015 मध्ये 35 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

जुलै 2017 मध्ये 36 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

16 नोव्हेंबर 2020 रोजी 37 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

16:47 November 16

व्हीआयपी प्रमुख मुकेश सहानीही मंत्रिमंडळात 

16:47 November 16

7 मंत्र्यांची भाजपच्या कोट्यातून शपथ 

16:46 November 16

जीवेश मिश्रा, रामप्रीत पासवान, अमरेंद्र प्रताप सिंह, मंगल पांडे, राम सुंदर राय मंत्रिमंडळात सामील 

16:46 November 16

माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन मंत्री होतील

16:46 November 16

आरजेडीने शपथविधीवर बहिष्कार टाकला, तेजस्वी यादव उपस्थित नाही

16:39 November 16

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपस्थित

16:39 November 16

गृहमंत्री अमित शाह शपथ सोहळ्याला उपस्थित 

16:36 November 16

नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाटणा - नितीश कुमार सातव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी बिहारचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. 10 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए)125 जागा मिळाल्या. त्यापैकी 74 जागा भाजपच्या खात्यात गेल्या. राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महागठबंधनने नितीशच्या विरोधात 110 जागांवर विजय मिळविला.

Last Updated : Nov 16, 2020, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details