महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राकेश टिकैत यांना गाझियाबादमध्ये अटक केल्याचे वृत्त खोटे

राकेश टिकैत यांनी ट्विट करत अटक झाली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माझ्या अटकेचे वृत्त हे भ्रामक आहे. मी गाझीपूर सीमेवर आहे, सर्व स्थिती सामान्य आहे.

By

Published : Jun 26, 2021, 4:45 PM IST

Rakesh Tikait
राकेश टिकैत

नवी दिल्ली - शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक केल्याची चर्चा खोटे आहे. याबाबतची माहिती राकेश टिकैत यांनी ट्विटरवरून दिली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक केल्याच्या चर्चेनंतर नवी दिल्लीच्या सीमांवर जमलेल्या शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अटक झाली नसल्याची माहिती किसान एकता मोर्चाच्या अनव्हेरिफाईड अकाउंटने ट्विट केली आहे. राकेश टिकैत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माझ्या अटकेचे वृत्त हे भ्रामक आहे. गाझीपूर सीमेवर आहे, सर्व स्थिती सामान्य आहे.

हेही वाचा-VIDEO: जवानांनी दहशतवाद्यांना अशी दिली अखेरची संधी, १ ठार १ शरण

किसान मोर्चाने ट्विट केले डिलीट

दिल्ली पोलिसांनीही राकेश टिकैत यांच्या अटकेते वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणा असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, किसान एकता मोर्चाने ट्विट करत चुकीचे ट्विट डिलीट केल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये पूर्व दिल्लीच्या डीसीपीला टॅग केले होते.राकेश टिकैत सुरक्षित आहेत. त्यांच्या अटकेचे वृत्त हे खोटे आहे. आता अपडेट दिले जाईल.

हेही वाचा-एकमेकांमध्ये लढत राहिलो तर कोरोना अन् एकत्रित लढलो तर देश जिंकेन - अरविंद केजरीवाल

शेतकरी नेते उपराज्यपालांची घेणार भेट-

दिल्ली पोलीस हे शेतकरी नेत्यांचे प्रतिनिधींना घेऊन एलजी हाऊस येथे (Farmers reaches lg house) पोहोचले आहेत. त्या ठिकाणी शेतकरी नेते उपराज्यपाल अनिल बैजल (LG Anil Baijal) यांना निवेदन देणार आहेत. या प्रतिनिधीमध्ये किसान युनियनचे महासचिव युद्धवीर सिंहसहित(Yudhveer Singh) १० नेते आहेत.

हेही वाचा-Covid 19 New Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना

शेतकरी आंदोलनाला शनिवारी ७ महिने पूर्ण-

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शनिवारी 7 महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शनिवारी ट्रॅक्टर रॅली काढली. शेतकरी राज्यपालांना निवेदन सोवपणार आहेत. गेल्या सात महिन्यांत सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण समस्या सुटू शकलेली नाही. आज पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्यपालांना निवेदन देतील व शेतकर्‍यांच्या समस्या मांडतील. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील उपराज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details