महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab Assembly : पंजाबच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ, 21 मार्च रोजी सभापती निवडीची शक्यता

पंजाबच्या 16व्या विधानसभेच्या पहिल्या सत्रात नवनिर्वाचित आमदारांनी ( Punjab Mla Took Oath ) गुरुवारी शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर डॉ. इंद्रबीर सिंह निज्जर यांनी ( Governor Indrabir Nijjar ) आमदारांना शपथ दिली.

By

Published : Mar 17, 2022, 3:32 PM IST

Punjab Assembly New MLA
Punjab Assembly New MLA

चंदीगड - पंजाबच्या 16व्या विधानसभेच्या पहिल्या सत्रात नवनिर्वाचित आमदारांनी (Punjab Mla Took Oath ) गुरुवारी शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर डॉ. इंद्रबीर सिंह निज्जर यांनी ( Governor Indrabir Nijjar ) आमदारांना शपथ दिली. तत्पूर्वी बुधवारी, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजभवनात डॉ. इंदरबीर सिंग निज्जर यांना पंजाब विधानसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ दिली.

अधिवेशनामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवार, 18 मार्च रोजी होळी आणि 19 आणि 20 मार्च रोजी साप्ताहिक सुटी असल्याने सभागृहाचे कामकाज होणार नाही. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर 21 मार्च रोजी सभागृह पुन्हा सुरू होईल, त्याच दिवशी आमदार सभापतींची निवड करतील. सोमवारीच 12 वाजता राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. 22 मार्च रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सभागृहात चर्चा होईल.

117 सदस्यांच्या सभागृहात आम आदमी पक्षाचे 92 आमदार आहेत, म्हणजेच विधानसभा अध्यक्ष 'आप'चा असेल. त्यामुळे पहिल्यांदाच महिला आमदाराला विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. दोन महिला आमदारांची नावे सध्या चर्चेत आहेत. या शर्यतीत जगरांवमधून दुसऱ्यांदा आमदार निवडून आलेल्या सर्वजित कौर मनुके यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय तळवंडी साबोमधून दुसऱ्यांदा आमदार झालेले प्रा. बलजिंदर कौर याही सभापतीपदाच्या दावेदार आहेत. परंपरेनुसार आम आदमी पक्ष काँग्रेसला उपाध्यक्षपदाची खुर्ची देणार का, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत पंजाबमध्ये AAP ने 92 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला 18, अकाली दलाला 3 आणि भाजपला 2 जागा मिळाल्या.

हेही वाचा -Praveen Darekar : दरेकर यांची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ; मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details