महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 1, 2023, 9:25 AM IST

ETV Bharat / bharat

Muslim Officer In Puri Temple : मुस्लिम अधिकाऱ्याचा पुरीच्या मंदिरात बळजबरीने प्रवेश, अडवणाऱ्या ऑफिसरची केली बदली!

ओडिशाच्या पुरी जगन्नाथ मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशास बंदी आहे. मात्र अलीकडेच एका मुस्लिम महिला अधिकाऱ्याने मंदिरात प्रवेश केला. प्रोटोकॉल ऑफिसरने त्यांना असे करण्यापासून रोखले असता त्याची 400 किलोमीटर दूर बदली करण्यात आली. या प्रकरणी आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.

Muslim Officer In Puri Temple
पुरी मंदिरात मुस्लिम अधिकारी

पुरी (ओडिशा) : मुस्लिम आयआरएस अधिकारी रेश्मा लखानी यांनी ओडीशातील जगन्नाथ पुरीच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरी पोलीस आणि प्रोटोकॉल ऑफिसर रोशन यादव यांनी त्यांना थांबवले. या घटनेनंतर आता या अधिकाऱ्याची नोटीस न देता बदली करण्यात आली आहे. आयआरएस अधिकाऱ्याच्या या निर्णयानंतर तीव्र असंतोष पसरला आहे.

मंदिरात बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी : पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी आहे. रेश्मा या मुस्लिम धर्माच्या असल्याने त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही त्यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून मंदिरात प्रवेश केला आणि जगन्नाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रोटोकॉल ऑफिसर रोशन यादव आणि पुरी पोलिसांनी थांबवले. यावरून त्या प्रोटोकॉल ऑफिसर रोशन यादववर चिडल्या. त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लखानी यांचे जीएसटीच्या मुख्य आयुक्तांना पत्र : लखानी यांनी जीएसटीच्या मुख्य आयुक्तांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 'अत्यंत दु:खाने आणि वेदनेने मी तुम्हाला प्रोटोकॉल ऑफिसरच्या वागणुकीबद्दल कळवू इच्छिते. पुरीमध्ये प्रोटोकॉल ड्युटीवर असलेल्या रोशन यादवने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्यांनी पोलिस इन्स्पेक्टरला कोणतेही कारण नसताना माझी तपासणी करण्यास सांगितले आणि माझ्यासोबत दहशतवादी असल्यासारखे वर्तन केले.'

लखानी यांच्यावर सोशल मीडियावर टीका : त्यांच्या तक्रारीनंतर भुवनेश्वर जीएसटी अधिकारी आयुक्तांनी रोशन यादव या प्रोटोकॉल अधिकाऱ्याची पुरीपासून 400 किमी दूर बदली केली. ही घटना सोशल मीडियवर व्हायरल झाल्यानंतर आयआरएस अधिकारी रेश्मा लखानी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी लखानी यांना मंदिरात प्रवेश करण्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दलच नव्हे तर अधिकाऱ्याची बदली केल्याबद्दल ट्रोल केले. युजर्स म्हणाले की, मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मुस्लिमांनी मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करणे योग्य नाही. ते म्हणाले की, या प्रोटोकॉल अधिकाऱ्याने आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले असताना त्यांची बदली होणे अत्यंत खेदजनक आहे.

लखानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी : लखनौ सर्कलच्या ऑल इंडिया सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर्स असोसिएशननेही या घटनेचा निषेध केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे ट्विटरवर लक्ष वेधले. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या प्रकरणी रेश्मा लखानी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आली आहे. ही घटना २४ तारखेला पुरी मंदिराच्या सिंह दरवाजाजवळ घडली.

हेही वाचा :Gulal From Flowers Controversy : 'हा सनातन धर्माचा अपमान', स्वागतासाठी वापरण्यात आलेल्या फुलांचा गुलाल बनवल्या वरून भाजपचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details