महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विरोधकांना संसदेचा वेळ आणि पैसा बर्बाद करायचा आहे; खासदार नवनीत राणांचा आरोप

संसदेत विरोधकांना केवळ गोंधळच घालायचा आहे. देशभरात चर्चेचे इतरही मुद्दे असताना संसदेत विरोधकांकडून गदारोळ होत असून संसदेचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्ना यांनी नवनीत राणांशी संवाद साधला.

By

Published : Aug 4, 2021, 7:45 PM IST

दिल्ली - संसदेत विरोधकांना केवळ गोंधळच घालायचा आहे. देशभरात चर्चेचे इतरही मुद्दे असताना संसदेत विरोधकांकडून गदारोळ होत असून संसदेचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अनामिका रत्ना यांनी नवनीत राणांशी संवाद साधला.

विरोधकांनी संसदेचा केवळ वेळ आणि पैसा बर्बाद करायचा आहे

खासदार आपल्या मतदारसंघातील मुद्दे सभागृहात मांडतात. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. यासंदर्भातील अनेक प्रश्न आहेत जे सभागृहात मांडायचे आहेत. मात्र गदारोळ होत असल्यामुळे सदस्यांना आपले प्रश्न मांडणे शक्य होत नाही आहे. तसेच वेळ आणि पैशाची बर्बादी होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नवनीत राणा म्हणाल्या, कोरोना, पूर आणि वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती यावर चर्चा होणं अपेक्षित होते. मात्र याही विषयावर चर्चा होत नाही आहे.

काँग्रेससह इतरही पक्षांनी सभागृहात चर्चा करून प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. तसेच पॅगेसेस प्रकरणी केंद्र सरकार चर्चा का करत नाही याविषयीही सरकारशी संवाद करावा. संसद चालविणे हे प्रत्येक पक्षाचे कर्तव्य असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. त्याचप्रमाणे ऑल्मपिकमधील भारतीय महिला खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details