महाराष्ट्र

maharashtra

वय झाले की मृत्यू होणारच; कोरोना रुग्णांविषयी भाजपा मंत्र्याचे संतापजनक वक्तव्य

गेल्या 24 तासांमध्ये मध्य प्रदेशमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी धक्कादायक विधान केले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू कोणीच रोखू शकत नाही. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही, वय झालं की मृत्यू होणारच, असे विधान त्यांनी केले आहे.

By

Published : Apr 15, 2021, 5:17 PM IST

Published : Apr 15, 2021, 5:17 PM IST

प्रेम सिंह पटेल
प्रेम सिंह पटेल

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, उत्तराखंडपाठोपाठ आता मध्य प्रदेशमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये मध्य प्रदेशमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी धक्कादायक विधान केले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू कोणीच रोखू शकत नाही. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही, वय झालं की मृत्यू होणारच, असे विधान त्यांनी केले आहे. या वादग्रस्त विधानामुळे ते टिकेचे धनी बनले आहेत.

कोरोना टाळण्यासाठी मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन आम्ही सर्व विधानसभा मतदार संघात जाऊन करीत आहोत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आता लोकांवर अवलंबून आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू कोणीच रोखू शकत नाही. मरणाऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाला शंका असेल तर डॉक्टरांना भेटा आणि कोरोनाबद्दल माहिती जाणून घ्या, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.

कोरोना मृत्यूच्या संख्येवर भाजपा मंत्र्याचे वादग्रस्त विधान

मृतांच्या संख्येबाबत आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण -

राज्य सरकार मृत्यूची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले. सरकार आकडेवारी लपवत नसून यंत्रणा चांगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही मृत्यू संशयित असल्याने आकडे कमी-जास्त दिसत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान राज्यात 49551 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या 24 तासांत 6012 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 309489 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा -रुग्णालयाऐवजी राज्य सरकार स्मशानभूमीची क्षमता वाढवतेय; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details