लखनऊ : गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्येला येण्यास विरोध केला आहे. ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतरच त्यांना अयोध्येत प्रवेश दिला जाईल. ब्रिजभूषण यांच्यानंतर पक्षातील विविध नेत्यांकडून विविध वक्तव्ये येत आहेत.
अयोध्येचे खासदार लल्लू सिंह देखील ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मताशी सहमत नाहीत. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे वैयक्तिक विधान असल्याचे भारतीय जनता पक्षाकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. भाजप स्वतःला त्यांच्या मताशी सहमत नाही. कोणीही अयोध्येत येऊ शकतो, असेही भाजपने स्पष्ट केले आहे.
लल्लू सिंह यांचा पाठिंबा
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार लल्लू सिंह यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, कैसरगंजचे भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह हे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधात आहेत. ब्रजभूषण शरण यांनी 5 जून रोजी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या समर्थनार्थ अयोध्येतील संतही आहेत. तसेच बाबरी मशिदीचा पक्षकार असलेला इक्बाल अन्सारीही ब्रिजभूषण सिंग यांना पाठिंबा देत आहे.
हेही वाचा -Villagers Left Village : देवीचा प्रकोप दूर करण्यासाठी संपूर्ण गावकरी गुरांसह जातात जंगलात राहायला; काय आहे 'या' गावाची गोष्ट
देवाने बुद्दी द्यावी
भाजप खासदार लल्लू सिंह यांनी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा विरोध हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. लल्लू सिंह म्हणाले की, 'जो कोणी अयोध्येत येईल त्याचे स्वागत आहे. जो कोणी भगवान रामाच्या आश्रयाने येतो त्याचे स्वागत आहे. ते म्हणाले की, हनुमानजींच्या कृपेने अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी कोणी आले तर त्यांचे स्वागत आहे. राज ठाकरे जी यांना मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सद्बुद्धी मिळावी. जेणेकरून त्यांचे आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे, श्री राम यांच्या चरणी प्रार्थना आहे.' असेही म्हणाले.
5 जूनला येणार अयोध्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर असून, त्याबाबत कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आघाडी उघडली आहे. 5 जून रोजी राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले आहे. यासाठी गोंडा-बहराइच आणि अयोध्येत अनेक ठिकाणी पोस्टरही लावण्यात आले आहेत.
हेही वाचा -Varanasi Gyanvapi Masjid : कोर्ट कमिशनर हटविले जाणार नाही- वाराणसी दिवाणी न्यायालयाचा निकाल