महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Delhi Crime News : डेटिंग अ‍ॅपवरून बनवलेल्या मित्राशी गैरवर्तणूक, मुलाने घाबरून चौथ्या मजल्यावरून मारली उडी

दिल्लीतील मुखर्जी नगर भागात एका विद्यार्थ्याने डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून एका मुलाशी मैत्री केली. त्यानंतर त्याने फोनवरून त्याला घरी बोलावून त्याच्याशी गैरवर्तन केले. (misbehave with friend made on dating app). घटनेनंतर मुलाने घाबरून घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. (boy jumps from fourth floor in delhi). त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 23, 2022, 6:58 PM IST

Updated : Dec 23, 2022, 7:27 PM IST

नवी दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीतील मुखर्जी नगर पोलीस स्टेशन परिसरात दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची घटना समोर आली आहे. (boy jumps from fourth floor in delhi). या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पीसीआर व्हॅनने घटनास्थळ गाठून जखमींना जहांगीरपुरी येथील बीजेआरएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पीडितेच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेतील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.(misbehave with friend made on dating app).

21 डिसेंबरच्या रात्रीची घटना : उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले की, मुखर्जी नगर भागात या रस्त्यावर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही घटना 21 डिसेंबरच्या रात्रीची आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, जखमी मुलगा मुखर्जी नगर भागातील पीजीमध्ये राहतो. डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून त्याने एका मुलाशी मैत्री केली, दोघांमध्ये सतत चॅटिंग होत असे. तोही मुखर्जी नगर परिसरात भाड्याने राहतो.

दोन विद्यार्थ्यांना अटक : विद्यार्थी त्याला भेटण्यासाठी मुलाच्या घरी गेला तेव्हा तेथे आधीच तीन-चार मुले पार्टी करत होती. त्यांनी पीडित मुलाशी गैरवर्तन केले ज्याला विद्यार्थ्याने आक्षेप घेतला. ते न पटल्याने पीडित विद्यार्थ्याने परत फिरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मुलांनी त्याचा रस्ता अडवला. रागाच्या भरात त्याने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्याच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. मुखर्जी नगर पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपी मुलांना अटक केली आहे, तर इतरांचा शोध सुरू आहे.

Last Updated : Dec 23, 2022, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details