महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Son of Satya Nadella Died : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा मुलगा झैन याचे निधन

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने (Microsoft Corporation) सांगितले की, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या (CEO Satya Nadella) यांचा मुलगा झैन नडेला यांचे सोमवारी निधन झाले. तो 26 वर्षांचा होता त्याला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी हा रोग होता.

son of CEO Satya Nadella has died
सत्या नडेला यांचा मुलगा झैन

By

Published : Mar 1, 2022, 12:53 PM IST

Updated : Mar 1, 2022, 1:23 PM IST

सॅन फ्रान्सिस्को: दिग्गज मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सांगितले की सीईओ सत्या नाडेला आणि त्यांची पत्नी अनु नडेला यांचा मुलगा झैन नडेला यांचे निधन झाले आहे, ब्लूमबर्गने मंगळवारी हे वृत्त दिले आहे. सॉफ्टवेअर निर्मात्याने आपल्या कार्यकारी कर्मचार्‍यांना ईमेलद्वारे सांगितले की, 26 वर्षांचा आणि सेरेब्रल पाल्सीने जन्मलेल्या झेनचे सोमवारी सकाळी निधन झाले.

ऑक्टोबर 2017 मध्ये, सत्या नाडेला यांनी एका ब्लॉग मध्ये त्यांच्या मुलाच्या जन्माबद्दल सांगितले. "एका रात्री, तिच्या गरोदरपणाच्या छत्तीसव्या आठवड्यात, अनुच्या लक्षात आले की बाळ तिला सवयीप्रमाणे हालचाल करत नाही.म्हणून आम्ही बेलेव्ह्यू येथील स्थानिक रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात गेलो, "आम्हाला वाटले की ही फक्त एक नियमित तपासणी असेल, नवीन पालकांना चिंता असते आम्हाला थोडी अधिक होती . खरे तर, मला स्पष्टपणे आठवते की आम्ही आप्तकालीन खोलीत वाट पाहत असताना नाराज झालो होतो.

परंतु तपासणी केल्यावर, डॉक्टरांना तातडीने निर्णय घेत उपचार केले झेनचा जन्म 13 ऑगस्ट 1996 रोजी रात्री 11:29 वाजता झाला. तो तीन पौंडाचा होता आणि तो रडला नाही. "झैनला वॉशिंग्टन लेक ओलांडून बेलेव्ह्यू येथील हॉस्पिटलमधून सिएटल चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभागात नेण्यात आले. मी रात्र हॉस्पिटलमध्ये घालवली आणि लगेचच दुसर्‍या दिवशी सकाळी झैनला भेटायला गेलो. तेव्हा मला माहीत नव्हते की आपले जीवन किती खोलवर बदलेल.

"पुढील काही वर्षांमध्ये, आम्ही गर्भाशयाच्या श्वासोच्छवासामुळे झालेल्या नुकसानाबद्दल आणि सेरेब्रल पाल्सीमुळे झेनला व्हीलचेअरची आवश्यकता कशी असेल आणि आमच्यावर अवलंबून राहावे याबद्दल आम्ही अधिक शिकलो. मी उद्ध्वस्त झालो होतो. पण बहुतेक मी दुःखी होतो. माझ्या आणि अनुसाठी गोष्टी कशा घडल्या यासाठी.

Last Updated : Mar 1, 2022, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details