नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 आणि 20 मे रोजी दोन उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत. ज्या जिल्ह्यात सर्वांत जास्त कोरोनाचा प्रसार झाला आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधतील. या वेळी राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित असतील.
प्राथमिक माहितीनुसार, 18 मे रोजी 9 राज्यांच्या 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्यानंतर पीएम मोदी 20 मे रोजी 10 राज्यांच्या 54 जिल्हाधिकाऱयांसोबत बैठक घेतील. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. यावेळी कोविड सोबतच सध्या प्रशासन म्युकरमायकोसिस बाबत करत असलेल्या नियोजनाबाबतही माहिती घेण्यात आली होती.