महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tiger Deaths In India : वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर, बिबट्यांच्या संख्येतही झपाट्याने घसरण

देशभरात वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. मोदी सरकारने 2022 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे बजेटरी वाटप 185 कोटी रुपयांवरून 300 कोटी रुपये केले होते. त्यानंतरही जंगलातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

Tiger Deaths In India
देशात वाघांचे मृत्यू

By

Published : Feb 24, 2023, 7:08 AM IST

डेहराडून : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, देशात दर 40 तासांत एका वाघाचा मृत्यू होतो आहे. या वर्षी विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 30 वाघांचा मृत्यू झाला आहे. एनटीसीएच्या अहवालानुसार, मध्य प्रदेशचा वाघांच्या मृत्यूबाबतीत सर्वात वाईट रेकॉर्ड आहे. तेथे सर्वाधिक 9 वाघांचे मृत्यू झाले आहेत. यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 7 वाघांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील वाघ नामशेष होतील का? : कर्नाटक आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तिथे प्रत्येकी तीन मृत्यू झाले आहेत. 1 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंड आणि आसाममध्ये प्रत्येकी दोन वाघ आणि तामिळनाडू, केरळ, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. एनटीसीएने जाहीर केलेली ही आकडेवारी व्याघ्र संवर्धन प्राधिकरणालाच प्रश्नात टाकणारी आहे. आता डायनासोरप्रमाणे भारतातील वाघही येत्या काही वर्षांत नामशेष होतील का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

बहुतांश वाघांचा मृत्यू नैसर्गिक :मोदी सरकारने 2022 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे बजेटरी वाटप 185 कोटी रुपयांवरून 300 कोटी रुपये केले होते. त्यानंतरही जंगलातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 2018 मध्ये झालेल्या वाघांच्या गणनेनुसार देशात एकूण 2967 वाघ आहेत. सर्वाधिक 526 वाघ मध्य प्रदेशात आहेत. यानंतर कर्नाटकात 524 वाघ आहेत तर उत्तराखंडमध्ये वाघांची संख्या 442 आहे. एक काळ असा होता की मध्य प्रदेश, केरळ-कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये वाघांची संख्या मुबलक होती. मात्र कधी रस्ता अपघात तर कधी त्यांचा बळी हे त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. मात्र, बहुतांश वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने होतो असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

बिबट्यांची संख्याही झपाट्याने घसरत आहे : देशात केवळ वाघांची संख्याच कमी होत आहे असे नाही, तर बिबट्याची संख्याही झपाट्याने कमी होते आहे. एनटीसीएच्या अहवालानुसार 2001 मध्ये देशभरात 167 बिबट्या मारले गेले. 2002 मध्ये 89, 2003 मध्ये 148, 2004 मध्ये 123, 2005 मध्ये 200, 2006 मध्ये 165, 2007 मध्ये 126, 2007 मध्ये 126, 2008 मध्ये 157, 2009 मध्ये 165, 2010 मध्ये 184, 2011 मध्ये 188, 2012 मध्ये 140, 2013 मध्ये 113, 2014 मध्ये 118 2015 मध्ये 127, 2016 मध्ये 154, 2017 मध्ये 159, 2018 मध्ये 169, 2019 मध्ये 113, 2020 मध्ये 170, 2021 मध्ये 182, 2022 मध्ये 162 तर 2023 मध्ये आतापर्यंत 25 बिबट्यांचा बळी गेला आहे.

हेही वाचा :Destroyed Camp of Naga Militants : अरुणाचल पोलिसांकडून चांगलांग जिल्ह्यात नागा अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त; मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details