हुगली येथे भाजप नेते लोकेट चॅटर्जी यांच्या कारवर स्थानिकांनी हल्ला केला. त्याशिवाय माध्यम प्रतिनिधींच्या वाहनांवरही लोकांनी दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली.
पश्चिम बंगालमध्ये साडेपाच वाजेपर्यंत 75.93 टक्के मतदान
18:22 April 10
भाजप नेते लोकेट चॅटर्जी यांच्या कारवर स्थानिकांचा हल्ला
17:33 April 10
पश्चिम बंगालमध्ये साडेपाच वाजेपर्यंत 75.93 टक्के मतदान
17:08 April 10
ममता दीदी बंगालच्या मतदारांची बदनामी करताहेत - पंतप्रधान मोदी
बंगालची ही निवडणूक फक्त भाजपच लढत नाही, तर बंगालमधील लोकही या निवडणुका लढवत आहेत. ममता दीदी आतापर्यंत निवडणूक आयोग, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, ईव्हीएमच्या गैरवापरावर बोलत होत्या. आता मात्र दीदी आपल्याच पक्षाच्या निवडणूक एजंटांना शिवीगाळ करीत आहेत. त्या इतक्या हतबल झाल्या आहेत की, बंगालच्या मतदारांची बदनामी करत आहेत. यापुढे संवेदनशीलतेने तुम्ही काही कराल ही आशाच बंगालच्या लोकांनी सोडली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कृष्णानगरमध्ये म्हणाले.
15:45 April 10
बंगालमध्ये तीन वाजेपर्यंत 66.67 टक्के मतदानाची नोंद
15:40 April 10
ममता बॅनर्जी उद्या कूच बिहारमधील घटनास्थळाला भेट देणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या कूच बिहारमधील घटनास्थळाला भेट देणार आहेत. बंगालमधील चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, कूचबिहार जिल्ह्यातील सीठलकुची विधानसभा मतदारसंघांतर्गत मठाभंगा ब्लॉकमध्ये हिंसाचार करणाऱ्या जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी गोळीबार केला, यामध्ये चार जवान शहीद झाले आहेत.
याच मतदारसंघातील दुसर्या घटनेत पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी आलेल्या एका मतदाराला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या घटनेसह एकूण पाच मृतांची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, विशेष पोलीस पर्यवेक्षक विवेक दुबे यांच्याकडे पोहोचलेल्या प्राथमिक अहवालात केंद्रीय संरक्षण दलाच्या जवानांना स्वसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला होता.
15:28 April 10
सौरव गांगुलीने केले मतदान
सौरव गांगुलीने आज बरीशा शशीभूषण जनकल्याण विद्यापीठ, बेहला, दक्षिण 24 परगणा येथील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला.
15:26 April 10
सीतलकुची विधानसभा मतदारसंघातील कूचबिहारच्या मतदान केंद्र क्रमांक 126 वर मतदान थांबविण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे डीआयजी जलपाईगुडी रेंज यांनी सांगितले.
11:29 April 10
मतदानादरम्यान हिंसाचार; चौघांचा मृत्यू
माथनभंगा येथे मतदानादरम्यान हिंसाचार झाला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने गोंधळ उडाला होता. स्थानिकांच्या सांगण्यानुसार केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांनी अगोदर गोळीबार केला.
10:11 April 10
आतापर्यंत १५.८५ टक्के मतदानाची नोंद
सकाळी ९ वाजून ३० मिनीटांपर्यंत १५.८५ टक्के मतदान झाले आहे.
10:11 April 10
भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळला
आज (शनिवार) सकाळी उलूबेरिया याठिकाणी एका भाजप कार्यकर्त्याचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. नंदा सरकार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
07:20 April 10
पश्चिम बंगालमध्ये साडेपाच वाजेपर्यंत 75.93 टक्के मतदान
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी सुरूवात झाली आहे. या टप्प्यात एकूण 44 जागांसाठी मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
373 उमेदवार निवडणूक रिंगणात
चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधईल 5 जिल्ह्यांतील 44 जागांवर मतदान होत आहे. यापैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या 44 जागांवर एकूण 373 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. एकूण 34 राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून 373 पैकी 153 उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
1.15 कोटी मतदार मतदानास पात्र
चौथ्या टप्प्यात एकूण 1,15,81,022 मतदार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पात्र आहेत. यात 58,82,514 पुरुष आणि 56,98,218 महिलांचा समावेश आहे. याशिवाय 290 तृतीयपंथी मतदारही मतदानासाठी पात्र आहेत. चौथ्या टप्प्यासाठी एकूण 15940 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सीआरपीएफच्या 789 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दिग्गजांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद
चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी तसेच अरुप बिस्वास अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.