महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र पोलिसांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव - एनसीपीसीआर अध्यक्ष प्रियांक कानूनगो

महाराष्ट्रातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुढे येत आहे. यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

rape cases Priyanka Kanungo reaction
एनसीपीसीआर अध्यक्ष प्रियांक कानूनगो

By

Published : Sep 25, 2021, 7:05 PM IST

दिल्ली -महाराष्ट्रातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुढे येत आहे. यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा -ओडिसात चक्रीवादळ धडकणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा; सात जिल्ह्यांत बचाव पथके तैनात

महाराष्ट्र पोलिसांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे आम्हाला वाटते. अशा प्रकारच्या घटनांवर वेळेत कारवाई ते करू शकत नाही. ते समाजापुढे चुकीचे उदाहरण मांडत आहेत. राज्य सरकार देखील पीडितेच्या पुनर्वसणाबाबत उदासीन आहे, असे प्रियांक म्हणाले.

याप्रकरणी आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचित केले आहे आणि त्यांना पूर्ण अहवालाची मागणी केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत असे अनेक प्रकार घडत असल्याचे आम्ही पाहिले आहे, असे देखील प्रियांक कानूनगो म्हणाले.

ठाण्यात बलात्काराच्या 2 घटना उघडकीस

अलिकडेच ठाणे जिल्ह्यातून दोन बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. कल्याण येथे एका 42 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह लैंगिक अत्याचाराच्या कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुदुर तालवाला, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

डोंबिवलीतूनही सामूहिक बलात्काराची घटना पुढे आली. याप्रकरणी 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे. २३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

15 वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ ला तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच, ९ महिन्यांपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास भा.द.वि ३७६, ३७६ (एन), ३७६ (३) ३७६ (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा -कमला हॅरिस यांच्या 'या' वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details