महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुनो नॅशनल पार्कमधून आली आनंदाची बातमी! 'आशा' चित्त्यानं दिला तीन पिल्लांना जन्म

Cheetah Kuno Park : सतत होणाऱ्या चित्त्यांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्त्यानं नुकताच तीन पिल्लांना जन्म दिला. यासह या उद्यानातील चित्त्यांची एकूण संख्या 18 वर पोहोचली आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 7:50 PM IST

Cheetah Kuno Park
Cheetah Kuno Park

श्योपूर (मध्य प्रदेश) Cheetah Kuno Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी चित्त्यांच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेला कुनो नॅशनल पार्क यावेळी पिल्लांच्या जन्मामुळे चर्चेत आला. येथे नुकतेच मादी चित्ता 'आशा'नं तीन पिल्लांना जन्म दिला. हे तीनही पिल्ले पूर्णपणे निरोगी आहेत.

'ज्वाला'नं 4 पिल्लांना जन्म दिला होता : येथे 17 सप्टेंबर 2022 रोजी नाबिमिया मधून 8 चित्ते आणले होते. यामध्ये 'आशा' या मादी चित्त्याचाही समावेश होता. आता येथील चित्त्यांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. याआधी कुनो नॅशनल पार्कमध्ये 'ज्वाला' नावाच्या मादी चित्यानं चार पिल्लांना जन्म दिला होता. मात्र त्यातील तीन पिल्लांचा मृत्यू झाला होता. एक शावक पूर्णपणे सुदृढ आहे आणि ते कुनो अभयारण्यात वावरत आहे.

चित्ता प्रकल्पाचं मोठं यश : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी या छोट्या पाहुण्यांच्या आगमनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. नामिबियातील चित्ता 'आशा' च्या पिल्लांचा जन्म झालाय, असं त्यांनी सांगितलं. हे देशात सुरू झालेल्या चित्ता प्रकल्पाचं मोठं यश असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन केलंय.

सध्या कुनोमध्ये किती चित्ते : सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानात 14 प्रौढ आणि एक शावक चित्ता आहे. आता तीन लहान शावकांसह ही संख्या 18 वर पोहोचली. यामध्ये गौरव, शौर्य, वायु, अग्नी, पवन, प्रभास आणि पावक या 7 नर चित्त्यांचा समावेश आहे. 7 मादी बिबट्यांमध्ये आशा, गामिनी, नभा, धीरा, ज्वाला, नीरवा आणि वीरा यांचा समावेश आहे. यापैकी केवळ दोनच चित्ते खुल्या जंगलात आहेत. जे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाहता येतात. तर उर्वरित सर्व चित्त्यांना मोठमोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आलंय.

हे वाचलंत का :

  1. Cheetah Died : मोदींनी आणलेल्या चित्त्यांना भारतीय वातावरण मानवेना? भारतात आणलेल्या 20 पैकी 8 चित्त्यांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details