तिरुवअनंतपुरम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज संयुक्तपणे आलापुळा बायपासचे उद्घाटन केले. या ६.८ किलोमीटरच्या दुपदरी बायपाससाठी तब्बल चाळीस वर्षांपासून येथील लोक प्रतीक्षा करत होते. अखेर आज (गुरुवार) याचे उद्घाटन झाले. विजयन यांनी तिरुवअनंतपुरममधून, तर गडकरी यांनी नवी दिल्लीमधून या कार्यक्रमाला हजेरी लावली.
तिरुवअनंतपुरम-एर्नाकुलम केवळ १० मिनिटात..
यावेळी हा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल विजयन यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, की या बायपासमुळे तिरुवअनंतपुरम-एर्नाकुलम मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पूर्वी हा मार्ग पार करण्यासाठी एक तास वेळ जात होता. मात्र, आता केवळ दहा मिनिटांमध्येच हे अंतर कापणे शक्य होणार असल्याचेही ते म्हणाले.