महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Murder of JDU leader : बिहारच्या दानापूर भागात जेडीयू नेत्याची राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या

बिहारमधील दानापूर भागात सत्ताधारी पक्ष जदयूचे नेते आणि नगर परिषदेचे उपाध्यक्ष (Danapur Nagar parishad Vice President) दीपक मेहता यांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या (JDU leader Deepak Mehta shot dead in Danapur) केली. घटनास्थळावरून चार रिकामे गोले जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको (Angry people blocked the road) करत निदर्शने केली.

Murder of JDU leader
जेडीयू नेत्याची हत्या

By

Published : Mar 29, 2022, 10:19 AM IST

पाटणा: बिहारमधील दानापूर परिसरात सोमवारी जमता दल यूनायटेडच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कुमार मेहता रात्रीचे जेवण करून आपल्या निवासस्थानाच्या आवारात फिरत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मेहता हे नगर परिषद दानापूरचे उपाध्यक्ष आहेत. दीपक कुमार यांच्या छातीत एक आणि डोक्यात दुसरी गोळी लागल्याचे कळते. गोळी झाडल्यानंतर दीपक रस्त्यावर पडला आणि गोळीबाराचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी गोंधळ घातला आणि नसरीगंज पोलिस चौकीची तोडफोड केली. त्यानंतर दानापूर-गांधी मैदान हा मुख्य रस्ता अडवला.

घटनास्थळी जमलेल्या स्थानिकांनी नेत्याला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, हत्येमागचे कारण समजू शकले नाही. दीपक मेहता यांनी 2020 ची विधानसभा निवडणूक दानापूरमधून आरएलएसपीच्या तिकिटावर लढवली होती, जी नंतर जदयूमध्ये विलीन झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला पांगवले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. ही घटना जमिनीच्या वादातून, निवडणुकीतील वैमनस्य किंवा अन्य कारणामुळे घडली आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हत्येनंतर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details