नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम महेश यांनी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणात भेदभाव होत असल्याचा मोदी सरकारवर आरोप केला आहे. 2 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणापैकी एकट्या गुजरातमध्ये 60 टक्के लसीकरण झाल्याचा दावा त्यांनी केला.
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम महेश यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेबाबत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
- 2 मे रोजी लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटासाठी केवळ 86,023 लाभार्थीच का असा प्रश्न जयराम यांनी विचारला आहे.
- केवळ 11 राज्यांनाच 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण करणे का शक्य झाले?
- 2 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणापैकी एकट्या गुजरातमध्ये 60 टक्के लसीकरण झाले. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा-एका रात्रीत लशींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही- आदर पुनावाला
पराष्ट्रमंत्र्यांबरोबर जयराम रमेश यांचे ट्विटरवर वाक्युद्ध
दिल्लीमधील इंडियन युथ काँग्रेसने फिलिपाईन्सच्या राजदुत कार्यालयाला ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली होती. त्यावरून परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम शंकर यांनी स्वस्तातील प्रसिद्धी अशी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावरून सुब्रमण्यम शंकर आणि जयराम रमेश यांच्यामध्ये नुकतेच ट्विटरवरून वाक्युद्ध झाले होते. गरजुंना मदत करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही कृपया काम करा, असा टोलावजा सल्ला जयराम यांनी पराष्ट्रमंत्र्यांना दिला होता.