महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ISRO News: इस्रोने रचला नवा इतिहास, एकाचवेळी प्रक्षेपित केले सात उपग्रह

इस्रोने एकाचवेळी सात उपग्रह प्रक्षेपित करून अंतराळविश्वातील दबदबा पुन्हा दाखवून दिला आहे. या सात उपग्रहांचे आज सकाळी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ISRO News
इस्रो

By

Published : Jul 30, 2023, 6:54 AM IST

Updated : Jul 30, 2023, 11:25 AM IST

इस्रोने केली मोठी कामगिरी

श्रीहरिकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) SHAR, श्रीहरिकोटा येथून सात उपग्रह C56 (PSLV-C56) सकाळी साडेसहा वाजता प्रक्षेपित केले आहेत. सिंगापूरच्या डीएस-एसएआरसह सहा उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केले आहेत. इस्रोच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

PSLV-C56/DS-SAR, हे सिंगापूरसाठी न्यूस्पेस इंडिया लिमिटेडची (NSIL) व्यायवसायिक मोहिम आहे. DS-SAR हा पृथ्वीवरील रडार इमेजिंग करणारा उपग्रह आहे. या व्यतिरिक्त मोहिमेत सहा उपग्रह देखील आहेत. सर्व उपग्रहांना 5 ऑर्बिटल कलतेसह 535 किमीत इंजेक्ट केले जाणार असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. पीएसएलव्हीचे हे 58 वे उड्डाण आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी प्रक्षेपण यशस्वी झाल्याने शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. सिंगापूरचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि इतर सहा उपग्रह PSLV रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. 44.4 मीटर लांब पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) रविवारी सकाळी 6.30 वाजता चेन्नईपासून सुमारे 135 किमी अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला आहे.

इस्रोच्या मोहिमेची जाणून घ्या वैशिष्ट्ये

  1. सिंगापूरला इस्रोच्या आजच्या प्रक्षेपणाचा मोठा फायदा होणार आहे. सिंगापूरच्या उपग्रहाला सर्व हवामानात दिवस-रात्री स्पष्टपणे छायाचित्रे घेता येणार आहेत.
  2. इतर उपग्रहांमध्ये VELOX-AM 23 kg सूक्ष्म उपग्रह, ARCAD (Atmospheric Coupling and Dynamics Explorer), प्रायोगिक उपग्रह Scub-2, 3U nanosatellite, Gallasia-2, ORB-12 Strider यांचा समावेश आहे.
  3. 360 किलो वजनाचा DS-SAR उपग्रह DSTA (सिंगापूर सरकारचे प्रतिनिधीत्व) आणि ST अभियांत्रिकी, सिंगापूर यांच्यातील भागीदारी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे
  4. सिंगापूरच्या उपग्रहात इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने विकसित केलेले सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) पेलोड आहे. त्यामुळे पेलोड DS-SAR ला 1-मीटर रिझोल्यूशनवर इमेजिंग करणे शक्य होते. त्यामुळे सिंगापूरला हवामानाचा अचूक अंदाज समजणे शक्य होणार आहे.
  5. सर्व उपग्रह हे 25 मिनिटानंतर पूर्णपणे वेगळी झाली आहेत. त्यामुळे इस्रोची मोहिम यशस्वी झाली आहे.
  6. चंद्रयान-3 प्रक्षेपणानंतर इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडद्वारे आजचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
  7. सिंगापूरचा उपग्रह 535 किमी उंचीवर जवळच्या विषुववृत्तीय कक्षेत (NEO) ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा-

  1. Chandrayaan 3 : इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले! ; असे झाले प्रक्षेपण, पहा व्हिडिओ
  2. Chandrayaan 3 : 'शास्त्रज्ञांच्या जिद्द आणि चातुर्याला सलाम!', चांद्रयान 3 च्या यशस्वी उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट
Last Updated : Jul 30, 2023, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details