नवी दिल्ली :भारताच्या खाजगी क्षेत्राने विकसित केलेले पहिले रॉकेट 'विक्रम-एस' ( Indias First Private Rocket ) १५ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित होणार ( launched on November 15 )आहे. हैदराबादस्थित स्पेस स्टार्टअप 'स्कायरूट एरोस्पेस'ने शुक्रवारी ही घोषणा केली. स्कायरूट एरोस्पेसच्या या पहिल्या मोहिमेला 'PRAUT' असे नाव देण्यात आले आहे जे तीन ग्राहक पेलोड वाहून नेतील आणि श्रीहरीकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) लाँच पॅडवरून प्रक्षेपित केले जाईल. स्कायरूट एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी एजन्सीला सांगितले की प्रक्षेपण सकाळी 11.30 वाजता केले जाईल.
महत्व काय? :काही वर्षापर्यंत जगामध्ये अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र हे १०० टक्के सरकारी अधिपत्याखाली होते. म्हणजेच कृत्रिम उपग्रह जरी सरकारी कंपन्यांसह विविध खाजगी कंपन्या बनवत असल्या तरी हे उपग्रह अवकाशात पोहचवण्यासाठी आवश्यक असलेले रॉकेट-प्रक्षेपक बनवण्याची मक्तेदारी ही सरकारी कंपनीकडेच होती. अवकाश तंत्रज्ञान या विशेषतः उपग्रह प्रक्षेपण ही खार्चिक, वेळखाऊ आणि अत्यंत क्लिष्ट गोष्ट असल्याने काही देशांमध्ये सरकारी कंपनीच्या नियंत्रणाखाली हळूहळू खाजगी कंपन्यांनी रॉकेटचे भाग बनवायला सुरुवात केली.