नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीची दुसरी लाट संपुष्टात येत असून दैनंदिन कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संक्रमणाचे 43 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संक्रमणाचे 43,071 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, देशात कोरोनामुळे 955 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, देशभरात कोरोनामधून बरे होणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे तर सक्रिय रुग्णही कमी होत आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 52,299 लोकही कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे, कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 2,96,58,078 झाली आहे. भारतातील कोरोनाचा पुनर्प्राप्ती दर सध्या 97.09 टक्के आहे. देशात एकूण प्रकरणांची संख्या 4,85,350 आहे. देशाचा कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा दर सध्या 1.59% आहे.
कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांच्या नोंद झालेल्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 3 जुलै पर्यंत देशभरात 35 कोटी 12 लाख जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर शनिवारी 67 लाख 87 हजार लसी देण्यात आल्या. तर आतापर्यंत 42 कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शनिवारी सुमारे 18 लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. ज्यांचा सकारात्मकता दर 3 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.