महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : बंद पडलेली लष्करी स्तरावरील चर्चा पुन्हा सुरू

सुमारे अडीच महिन्यांपूर्वी भारत आणि चीनच्या लष्करात सीमावाद सोडविण्यासाठी शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही लष्करात कमांडर स्तरावरील बैठका सुरू होत आहे. आज (रविवार) चर्चेची नववी फेरी आहे.

सीमावाद
सीमावाद

By

Published : Jan 24, 2021, 7:49 AM IST

नवी दिल्ली -सुमारे अडीच महिन्यांपूर्वी भारत आणि चीनच्या लष्करात सीमावाद सोडविण्यासाठी बैठक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही लष्करात कमांडर स्तरावरील बैठका सुरू होत आहे. आज (रविवार) चर्चेची नववी फेरी आहे. लडाखमध्ये मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने उभे आहेत. दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती 'जैसे थे' आहे.

मोल्डो येथे होणार बैठक -

भारताच्या XIV कॉर्प्स कमांडचे लेफ्टनंट जनरल पीजेके मेनन आणि दक्षिण झिन्झियांग लष्करी विभागाचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांच्यात मोल्डो येथे बैठक होणार आहे. मोल्डो हे ठिकाण चीनमध्ये असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चूशूल सेक्टरच्या जवळ आहे. 'बॉर्डर पर्सोनेल मिटिंग' पॉईंटवर ही बैठक होणार आहे.

सीमेवरील स्थिती तणावाची -

भारताने चिनी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले होते. त्याला चीनकडून उत्तर मिळाल्यानंतर बैठकांना दोघांकडूनही परवानगी मिळाल्याची माहीती सुत्रांनी दिली. चीन आणि भारताने सीमेवर सुमारे ५० हजार सैन्य अनिश्चित काळासाठी तैनात केले असून वरिष्ठ लष्करी स्तरावर कोणतीही चर्चा होत नव्हती. सीमेवरील कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी चर्चा पुन्हा सुरू होत आहे.

परराष्ट्र विभागाचे प्रतिनिधीही राहणार उपस्थित -

आज होणाऱ्या चर्चेसाठी परराष्ट्र मंत्रालयातील प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहे. दोन्ही देशांतील सीमा वाद सोडविण्यासाठी डब्ल्यूएमसीसी अंतर्गत बैठका आयोजित करण्यात येतात. या बैठका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील पूर्व आशिया विभागाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली होतात. तेही आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. चीन आणि भारतीय लष्कराची शेवटची बैठक ६ नोव्हेंबराल झाली होती. तर डब्ल्यूएमसीसीची बैठक १८ डिसेंबरला झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details