अमरावती (आंध्र प्रदेश) -भारतीय वंशाची सिरिशा बांडला (Sirisha Bandla) एक नवा इतिहास रचण्यास तयार झाली आहे. मुळची आंध्र प्रदेशमधील असलेली सिरिशा अंतराळ प्रवास करणार आहे. अशी कामगिरी करणारी ती सुनिता विल्यम्सनंतर दुसरी भारतीय वंशाची महिला आहे. अमेरिकेची खासगी अंतराळ संस्था व्हर्जिन गैलेक्टिकचे (Virgin Galactic) सर रिचर्ड ब्रेनसन ( Sir Richard Branson) यांच्यासोबत सहा जण अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यामध्ये सिरिशा बांडलाचा देखील समावेश आहे.
व्हर्जिन गैलेक्टिने त्यांचं अवकाशयान 'यूनिटी-22' (Unity-22) 11 जुलै रोजी लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. अंतराळात उड्डाण करण्याची कामगिरी करणारी सिरिशा ही तेलुगू वंशाची पहिली महिला ठरेल. अंतराळ प्रवासादरम्यान, सिरीशा रिचर्स संबंधित काम करणार आहे. अभियान अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयोग म्हणून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच अंतराळ प्रवासासाठी आवश्यक सर्व परवानगी कंपनीला मिळाली आहे, अशी माहिती व्हर्जिन गॅलॅक्टिककडून देण्यात आली आहे.