एजबॅस्टन : भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) संघात कसोटी मालिकेनंतर तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. तसेच आज या मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथील स्टेडिमवर संध्याकाळी सातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( England opt to bowl ) आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नेतृत्वाखील खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथम फलंजदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ( All-rounder Hardik Pandya ) आपल्या शानदार कामगिरीने प्रभावित केले होते. आज ही त्याच्याकडून याच खेळीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे.
भारतीय संघात चार, तर इंग्लंड संघात दोन बदल -