महाराष्ट्रात आज कडक लॉकडाऊनची शक्यता
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊनबाबत माहिती देणार आहे.
महाराष्ट्रात आज कडक लॉकडाऊनची शक्यता महाराष्ट्रात आज रात्री 8 नंतर मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊनबाबत घोषणा?
महाराष्ट्रात अनेक निर्बंध लागू आहेत. मात्र आता महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू शकते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजेपासून संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची विनंती केली आहे. ही विनंती सरकारच्या सर्व मंत्र्यांच्या वतीने करण्यात आली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. असे टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आज रात्री 8 नंतर मुख्यमंत्र्यांची लॉकडाऊनबाबत घोषणा? राज्यात आजपासून कोरोनाची नवी नियमावली
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून अखेर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील.
राज्यात आजपासून कोरोनाची नवी नियमावली 'रामनवमी'साठी सजले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
आज रामनवमी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज चैत्र शुद्ध 9 रामनवमी निमित्ताने रंगीबेरंगी फुले व फळांची आरास करण्यात आली आहे. चार प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून भाविकांसाठी मंदिर 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
'रामनवमी'साठी सजले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर झारखंडमध्ये उद्यापासून लॉकडाऊन जाहीर
कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याने झारखंडमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. 22 चे 29 एप्रिल या कालावधित हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद असणार आहेत.
झारखंडमध्ये उद्यापासून लॉकडाऊन जाहीर गोव्याच्या मुख्यमंत्र्याची आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर राज्यातील पुढील उपाययोजना जाहीर करणार आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्याची आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा आयपीयलमध्ये आज रंगणार दोन सामने
आयपीयलमध्ये आज रंगणार दोन सामने रंगणार आहे. पहिला सामना पंजाब किंग्ज विरद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. 3 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईच्या एम ए चिंदमबरम स्टेडिअमवर होणार आहे. तर, दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा समना होणार आहे.
आयपीयलमध्ये आज रंगणार दोन सामने