रायपूर : कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी वेळ चांगला असणे आवश्यक आहे. कोणतेही कार्य शुभ मुहूर्तावर केले गेले तर, ते फलदायी ठरते. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात पूजा, यज्ञ आणि ध्यान केल्यानंतरच करावी. जेणेकरून ते कार्य आपल्यासाठी यशस्वी होऊन; त्याचे फळ आपल्याला अनुकूल होईल. अशुभ काळात केलेले शुभ कार्यही विपरीत परिणाम देते. म्हणूनच सर्व नियमांचे पालन करून शुभ मुहूर्तावर आपले कार्य सुरू करावे. मार्च महिन्यात घरोघरी लग्न, विवाह नोंदणी, नवीन वाहन, उपनयन आणि घराचे नूतनीकरण, मुंडण, यंत्रांचे विस्थापन, व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक प्रकारचे मुहूर्त आहेत.
शुभ काळ : ज्योतिषी आणि वास्तुविशारद पंडित विनीत शर्मा यांनी सांगितले की, 'गुरुवार 9 मार्च हा उपनयन संस्कारासाठी शुभ आहे. त्याचप्रमाणे 9 मार्च आणि 10 मार्च हे गृहप्रवेश करण्यासाठी पवित्र आहेत. 1 मार्च घराच्या नूतनीकरणासाठी आणि घराच्या बांधकामासाठी शुभ दिवस आहे. 3 मार्च, 4 मार्च आणि 9 मार्च हे देखील विविध शुभ कार्यासाठी शुभ दिवस आहेत. गुरुवार 9 मार्च वाहन खरेदीसाठी शुभ आहेत. 3 मार्च, 5 मार्च आणि 10 मार्च हे नविन व्यवसायाच्या स्थापनेसाठी शुभ दिवस आहेत. 9 मार्च हा मुंडन विधींसाठी (मुंज) शुभ दिवस मानला गेला आहे.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त : ज्योतिषी आणि वास्तुविशारद पंडित विनीत शर्मा यांनी सांगितले की, 'व्यवसाय सुरू करण्यासाठी 9 मार्च हा शुभ दिवस आहे. त्याचप्रमाणे 12 मार्च रोजी रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर गुह प्रवेश देखील करता येईल. 20 मार्च रोजी गर्भाधान, संस्कार, पुंसावन संस्कार, इत्यादीसाठी सोमवारची विशेष पूजा करता येते. घरात प्रवेश करताना पूजा शुद्ध मनाने करावी आणि सद्गुणी लोकांसोबत करावी.