आग्रा : व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जेन फान वांग जियांग हे भारत भेटीवर आले आहेत. मात्र त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये मोठी चूक झाल्याचे उघड झाले आहे. व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जेन फान वांग जियांग यांना रविवारी ताजमहालमध्ये बेकायदेशीरपणे नेण्यात आले. त्यामुळे गाईड, पोलीस, प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढेच नाही तर संरक्षण मंत्र्यांना जुने शू कव्हर्सही देण्यात आले. एंट्री गेटवरही सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी पाहुण्यांना बराच वेळ गेटबाहेर उभे राहावे लागले. यासंदर्भात ताजमहालचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक प्रिन्स वाजपेयी यांनी सांगितले पर्यटक गाईडची चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे.
संरक्षण मंत्री जेन फान वांग जियांग रविवारी झाले दाखल :व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जेन फान वांग जियांग त्यांच्या शिष्टमंडळासह रविवारी सकाळी आग्रा येथे आले होते. ते त्यांच्या शिष्टमंडळासह रविवारी ताजमहालला भेट देण्यासाठी शिल्पग्राम येथे पोहोचले. तेथून विदेशी पाहुणे गोल्फ कार्टमध्ये बसून ताजमहालच्या पूर्वेकडील गेटवर पोहोचले. व्हीव्हीआयपी भेटीत पोलीस, प्रशासन, आणि सीआयएसएफचे जवानही उपस्थित होते. व्हीव्हीआयपी पाहुणे असतानाही त्यांना शाकीर कुरेशी नावाच्या टुरिस्ट गाईडने ताजमहाल दाखवला. मात्र त्याला परदेशी पर्यटकांना नेण्याची परवानगी नसल्याचे उघड झाले.