तामिळनाडू -तामिळनाडूतील कुंभकोणम येथील नादनापुरेश्वर शिवन मंदिरातून देवी पार्वतीची मूर्ती 50 वर्षापूर्वी गायब झाली होती. ती मुर्ती आता न्यूयॉर्कमध्ये सापडली आहे. तामिळनाडू सीआयडीने सांगितले की, न्यूयॉर्कमधील बोनहॅम्स ऑक्शन हाऊसमध्ये ही मूर्ती सापडली ( Parvati stolen from temple in Kumbakonam traced to US ) आहे.
1000 हजार वर्ष जुनी असलेली ही मुर्ती अचानकपणे गायब झाली होती. 1971 साली याप्रकरणी स्थानिक पोलिसांती तक्रार देण्यात आलेली. त्यानंतर फ्रेब्रुवारी 2019 साली के वासू या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आयडॉल विंगचे निरीक्षक एम चित्रा यांनी तपास हाती घेतली. त्यांनी परदेशातील विविध संग्रहालये आणि लिलावगृहांमध्ये चोल काळातील पार्वती मूर्ती शोधण्यास सुरुवात केली.