महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मला माहित नाही चांगला माणूस कोण वाईट माणूस कोण, अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा यांना रडू कोसळले

अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व देश आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा यांना भारतात आणण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना हिंडन एअरबेसवर रडू या सर्व परिस्थितीमुळे रडू आले. गेल्या 20 वर्षात जे काही बांधले गेले ते आता संपले आहे अशी हतबलता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा
अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा

By

Published : Aug 22, 2021, 6:35 PM IST

नई दिल्ली/ गाजियाबाद - तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व देश आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा यांना भारतात आणण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना हिंडन एअरबेसवर रडू या सर्व परिस्थितीमुळे रडू आले. गेल्या 20 वर्षात जे काही बांधले गेले ते आता संपले आहे अशी हतबलता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मला माहित नाही चांगला माणूस कोण वाईट माणूस कोण

नरिंदर म्हणाले की, विमानतळाच्या सर्व गेटवर पाच ते सहा हजार लोक उभे आहेत. तिथे परिस्थिती खूप वाईट आहे. मला माहित नाही चांगला माणूस कोण वाईट माणूस कोण आहे. जेव्हा नरिंदर यांना विचारण्यात आले की तुम्ही खासदार आहात, तेव्हा त्यांना रडू आले. दरम्यान, नरिंदर सिंह म्हणाले की, तिथे सर्व काही संपले आहे. तसेच, 200 शिख-हिंदू बांधव अजूनही तिथे अडकले आहेत. मात्र, कशाबद्दलच तिथे आता विश्वास उरलेला नाही.

भारतात पोहोचलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि: श्वास

तालिबानने एका आठवड्यापूर्वी काबूल ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या राजधानीत सुरक्षा स्थिती बिघडत असताना भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) लष्करी वाहतूक विमानाने रविवारी 107 भारतीयांसह 168 लोकांना काबुलमधून बाहेर काढण्यात आलेल्या 135 लोकांनाही भारतात आणण्यात आले आहे. यावेळी, रविवारी भारतात पोहोचलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर सुटकेचा नि: श्वास टाकल्याचा आनंद दिसत होता. रविवारी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास जमावात सात अफगाण नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत ब्रिटीश लष्कराने कबुली दिली आहे. चेंगराचेंगरी आणि चिरडल्यामुळे लोक जखमी झाले. देशाबाहेर कोणत्याही विमानात चढण्यासाठी हताश असलेल्या लोकांना पांगवण्यासाठी तालिबानी लढाऊ हवेत गोळीबार करत असताना, ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

भारतीय हवाई दलाचे विमान मंगळवारी अफगाणिस्तानातून भारतात पोहोचले

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानने रविवारी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून तेथे अराजकतेचे वातावरण आहे. अफगाणिस्तान-तालिबान या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑगस्ट रोजी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली. यानंतर, काबूलमधील भारतीय राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांसह 120 लोकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मंगळवारी अफगाणिस्तानातून भारतात पोहोचले. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत अफगाणिस्तानातून सर्व भारतीयांच्या सुरक्षित परताव्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच, काबूल विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू होताच तेथे अडकलेल्या इतर भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था केली जाईल असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी लवचिक भूमिका घेतली आणि संपूर्ण अफगाणिस्तानात "कर्जमाफी" ची घोषणा केली आणि महिलांना त्याच्या सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. यासह, तालिबान लोकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे, जे एक दिवसापूर्वी काबूलमधून त्याच्या राजवटीतून सुटण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले होते. त्यामुळे विमानतळावर अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यामध्ये अनेक लोक मारले गेले होते.

मध्य आशिया आणि रशियामध्ये भारतीय व्यापाराला प्रवेश मिळेल

महत्वाचे म्हणजे भारताने 2001 पासून अफगाणिस्तानमध्ये पुनर्बांधणीसाठी 3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. संसद भवन, सलमा धरण आणि झरंज-देलाराम महामार्ग प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याशिवाय भारत इराणच्या चाबहार बंदराच्या विकासावर काम करत आहे. भारत इराणच्या सामरिक चाबहारच्या शाहीद बेहेष्टी भागात पाच बर्थसह दोन टर्मिनल बांधणार होता, जे ट्रान्झिट कॉरिडॉरचा भाग बनले असते. यामुळे अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि रशियामध्ये भारतीय व्यापाराला प्रवेश मिळेल. या प्रकल्पात दोन टर्मिनल, 600 मीटर कार्गो टर्मिनल आणि 640 मीटर कंटेनर टर्मिनल होते. याशिवाय 628 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधला जाणार होता, जो चाबहारला अफगाण सीमावर्ती शहर झाहेदानशी जोडेल. चीनच्या चाबहारला प्रतिसाद म्हणून भारताने ग्वादर प्रकल्पात गुंतवणूक केली होती. मात्र, आता तालिबानच्या राजवटीत ते पूर्ण होण्याबाबत शंका आहे, असे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details