नवी दिल्ली : देशातील प्रमुख 7 शहरांमधे 2021 मधे 2020 च्या तुलनेत घराची विक्री 71 टक्याने वाढली असून सरासरी 2 लाख 36 हजार 430 घरांची विक्री झाली आहे. 2020 मधे 1 लाख 38 हजार 350 घरांची विक्री झाल्याची नोंद आहे. 2019 मधे हा 2 लाख 61 हजार 358 घरांची विक्री झाली होती. गृह कर्जावरील कमी व्याज दर, घरांची मागणी, घर घेण्याची इच्छा, आणि महाराष्ट्रासह काही राज्यांनी स्टॅंप ड्युटी वर दिलेली सुट तसेच बिल्डरांनी ठेवलेल्या विविध आकर्षक योजना या कारणांमुळे घरांच्या विक्रीत वाढ होत आहे असे समोर आले आहे .
एनाराॅकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हणले आहे की, कोरोना व्हायरस महामारी आटोक्यात राहिली तर 2021 च्या आधारावर हे सांगता येईल की, 2022 मधे घरांची विक्री समाधानकारक राहिल. सणवारांचे दिवस, घरांची वाढलेली मागणी आणि इतर कारणांमुळे गेल्या वर्षी एकट्या चौैथ्या तीमाहीत घरांच्या विक्रीचे प्रमाण 39 टक्के राहिले.