मेष : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.
वृषभ : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.
मिथुन :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
सिंह :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.
कन्या : मनातील नकारात्मक भावनांमुळे भीती राहील. मित्र-मैत्रिणींशी मतभेद किंवा वाद होऊ शकतात. गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. कोणाशीही वादात किंवा चर्चेत पडू नका. प्रवासाची शक्यता आहे. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल आणि जोडीदारासोबतचे जुने वाद मिटतील. आरोग्य चांगले राहील.