मेषआज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.
वृषभआज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल.
मिथुन आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
कर्कआज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे.
सिंहआज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. वाणी व व्यवहार ह्यात संयम व विवेक राखावा.
कन्याआज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल.