मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या तथाकथीत वसूली प्रकरणी एका हवाला ऑपरेटरला गुजरातच्या मेहसाणामधून अटक करण्यात आली आहे. अल्पेश पटेल, असे या व्यक्तीचे नाव आहे. मेहसाणा रेल्वे स्थानकावरून काल रात्री त्याला अटक करण्यात आली. परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून पटेल याने बिमल अग्रवाल यांच्याकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण -
तथाकथीत वसूली प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मुंबईतील व्यापारी बिमल अग्रवाल यांनी एक गौप्यस्पोट केला होता. सचिन वाझे यांनी आपला एक बॉस परमबीर सिंग असल्याचे म्हटले होते, अशी माहिती बिमल अग्रवाल यांनी पोलिसांनी दिली होती. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा अडचणीत आले होते. तसेच यावेळी अग्रवाल यांनी भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांचा देखील उल्लेख केला होता. यासोबतच पोलीस दलात दाखल होण्यापूर्वीच सचिन वाझे यांनी अनेक व्यापारी, बारमालक यांच्याशी संपर्क केला होता, असेही अग्रवाल यांनी सांगितले होते.