हरिद्वार - उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये 14 जून रोजी डॉ. प्रिया आहुजा यांनी योगाच्या आठ कोन आसनाचा (अष्टावक्रसन) विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये त्या यशस्वी झाल्या आहेत. (Priya Ahuja Ashtavakrasana Yoga Record). त्यांनी 3 मिनिटे 29 सेकंद अष्ट वक्रसन योग करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. यासोबतच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. (priya ahuja guinness world record).
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नाव - डॉ. प्रिया आहुजांनी सांगितले की, यापूर्वी या योगासनासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 मिनिटे 6 सेकंदांचा विक्रम नोंदवलेला होता. त्यांनी तो आता मोडला आहे. त्यांनी हे सर्व पुराव्यासह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठवले होते, ज्याचा निकाल आता लागला आहे. यासोबत प्रिया आहुजांनी सांगितले की, या आधी त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. तिथे त्यांनी 20 जून रोजी 4 मिनिटे 26 सेकंद ही वेळ नोंदवली होती. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. प्रिया आहुजा यांनी सांगितले की, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पुरुष आणि महिला असा कोणताही वयोगट नाही. त्यात फक्त आणि फक्त तुमचा टायमिंग रेकॉर्ड दिसतो. ज्यामध्ये त्यांनी 4 मिनिटे 26 सेकंदाची वेळ नोंदवली.