महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 26, 2022, 7:20 PM IST

ETV Bharat / bharat

Jignesh Mevani : आमदार जिग्नेश मेवाणी यांच्य्या अडचणी वाढल्या.. न्यायालयाकडून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी ( Congress MLA Jignesh Mevani ) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आसाम पोलिसांनी अटक ( Assam Police Arrested Jignesh Mevani ) केल्यानंतर त्यांना बारपेठा येथील न्यायालयात ( Barpeta Court Assam ) हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( Jingnesh Mevani In Police Custody ) आहे.

MLA Jignesh Mevani
आमदार जिग्नेश मेवाणी

गुवाहाटी ( आसाम ) : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी ( Congress MLA Jignesh Mevani ) यांना बारपेटा रोड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात ( Assam Police Arrested Jignesh Mevani ) आज बारपेटा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ( Barpeta Court Assam ) हजर करण्यात आले. कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मेवानी यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ( Jingnesh Mevani In Police Custody )सुनावली. बारपेटा पोलिसांनी 12 दिवसांच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला.

दुसरीकडे, मेवाणीचे वकील अंशुमन बोरा यांनी त्यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. आज न्यायालयात वकील बोरा यांनी जिग्नेश मेवाणी यांच्या बाजूने युक्तिवाद केला. बारपेटा पोलिसांनी मेवाणीवर ताशेरे ओढलेल्या नव्या प्रकरणाबाबत न्यायालयाला माहिती न देऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही वकील बोरा यांनी केला आहे.

असे आहे प्रकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आमदार जिग्नेश यांनी एक ट्विट केले होते. याच दरम्यान मोदी स्वतः गुजरात दौऱ्यावर होते. जिग्नेश यांनी ट्विट केल्यानंतर आसाममध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Jignesh Mevani Arrest : आमदार जिग्नेश मेवाणी आसासमधील कोकराझार पोलिसांच्या ताब्यात, पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details