महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gujarat Elections 2022 : काँग्रेसचे उमेदवार कांतिभाई खराडी 'बेपत्ता'

गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भाजप उमेदवार आणि पक्षाच्या गुंडांनी काँग्रेस उमेदवार कांतिभाई खराडी यांच्यावर हल्ला केला, कांतिभाई अद्याप बेपत्ता ( kantibhai kharadi Missing ) आहेत. ( Congress Candidate kantibhai kharadi Missing )

Gujarat Elections 2022
कांतिभाई खराडी बेपत्ता

By

Published : Dec 5, 2022, 7:13 AM IST

अहमदाबाद : काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार कांतीभाई खराडी यांच्यावर रविवारी संध्याकाळी हल्ला करण्यात आल्याने ते बेपत्ता ( kantibhai kharadi Missing ) झाले आहेत. बनासकांठा पोलिसांनी खराडीचा शोध सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष जिग्नेश मेवाणी ( Jignesh Mevani ) यांनी सर्वप्रथम पक्षाच्या बेपत्ता उमेदवाराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. ( Congress Candidate kantibhai kharadi Missing )

पक्षाच्या गुंडांनी केला हल्ला : काँग्रेसचे उमेदवार कांतिभाई खराडी यांच्यावर भाजपचे उमेदवार आणि पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला, ते गाव आणि कार्यकर्त्यांच्या घरांना भेटी देऊन परत येत होते, त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, हा त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न होता, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. वाहन उलटले आणि कांतीभाई खराडी हे अपघातग्रस्त झाले ते अजूनही बेपत्ता आहे.

हल्ल्याची माहिती नियंत्रण कक्षाला : कांती खराडी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्याची माहिती बनासकांठा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष प्रभारी यांनी दिली आहे. हडद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याबाबत तपास अधिकारी व्ही.आर. मकवाना यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह वाघेला यांनी सांगितले की, खराडीपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. पोलिस अधीक्षकांशी बोलण्याचा आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरीही ते माझ्या कॉलला उत्तर देत नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details