नवी दिल्ली - भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा कोणती? या प्रश्नाला गुगलकडून 'कन्नड भाषा' असे उत्तर आल्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. गुगल कंपनीला कर्नाटक सरकार कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे कर्नाटकचे कन्नड, संस्कृतीक आणि वन मंत्री अरविंद लिंबावली यांनी सांगितले. चूक लक्षात आल्यानंतर गुगलकडून माफी मागण्यात आली आहे. नकळत लोकांच्या भावनांना ठेच पोहचवल्याबद्दल गुगलने माफी मागितली आहे.
राजकीय पक्षांनी गुगलाच निषेध दर्शवला गुगल सर्च इंजिन परीपूर्ण नसून चूका होऊ शकतात. सर्च इंजिनमध्ये येणारे उत्तर हे गुगलचे मत असू शकत नाही. ही चूक असल्याचे आम्हाला मान्य आहे. युजर्सकडून चुका अवगत करून दिल्यानंतर त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे गुगलच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
कर्नाटकातील सर्व राजकीय पक्षांनी गुगलाच निषेध दर्शवला आहे. कन्नड भाषेचा आपला एक इतिहास असून ही भाषा जवळपास 2 हजार 500 वर्ष जुनी आहे. कानडी लोकांची कन्नड भाषा गौरवाची बाब आहे. कन्नड भाषेचा अपमान केल्याप्रकरणी गुगलविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे कर्नाटकचे कन्नड, संस्कृतीक आणि वन मंत्री अरविंद लिंबावली म्हणाले. तसेच कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनीही गुगलाचा निषेध नोंदवला आहे.
कर्नाटक राज्यामधील प्रमुख भाषा...
कन्नड (किंवा कानडी) ही भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा सुमारे 3.8 कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील 40 आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो. ही एक द्रविड भाषाकुळातील भाषा आहे.