मुंबई - सध्या लगनसराई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचे भाव रोज वाढत आहेत. लग्नाच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळे त्यावर वाढ कायम आहे. आज दि.(18 एप्रिल)रोजी मुंबईत १ ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी ४,९५५ आहे. तर, २४ कॅरेट सोन्यासाठी ५,४०६ आहे. (Todays Gold Rate In Mumbai) १६ एप्रिलच्या तुलनेत आज सोने काही ठिकाणी स्थिर दिसून आले. तर, काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोने महाग होणार, हे निश्चित आहे.
सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर - गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. सोन्याचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक वर्षापूर्वी २४ कॅरट सोन्याची किंमत प्रति तोळा ४७,८९० रुपये इतकी होती. (Gold Prices Rising Every Day) आज २४ कॅरट सोन्याचे भाव ५३,४५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत.