अमरावती -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ( Indian Institude of Mass Communication ) हे वारंवार वादात सापडले आहे. आयआयएमसीचे अमरावती येथील संचालक अनिलकुमार सौमित्र यांच्याविरोधात प्राध्यापकाचा वारंवार अपमान आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अमरावती येथील पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. (Anil Saumitra under the Atrocities Act) दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ( IIMC ) अमरावती वरून आता नागपूरला हलवण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.
आयआयएमसी अमरावती येथे विनय सोनुले हे 2019 पासून सहायक कंत्राटी प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे. अनिलकुमार सौमित्र यांनी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सोनुले यांना सर्वांसमोर अपमानित करणे, मानसिक त्रास देणे, संस्थेतील अधिकार काढुण घेणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे प्राध्यापक विनय सोनूले यांनी अनिलकुमार सौमित्र यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अनिलकुमार सौमित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे (IIMC Will Shift To Nagpur ) गत चार दिवसंपासूम हे केंद्र बंदच आहे. तसेच, आयआयएमसीचे अमरावती केंद्र 11 वर्षांपासून दुर्लक्षित आहे. त्याचे स्वतःचे कॅम्पस नाही, पुरेसे विद्यार्थी नाहीत आणि तज्ञ शिक्षक नाहीत असेही बोलले जात आहे.
प्रा. अनिलकुमार सौमित्र आहेत वादग्रस्त
प्रा. सौमित्र यांनी महात्मा गांधी यांचा 'फादर ऑफ पाकिस्तान' असा उल्लेख केलेला असल्याने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ते कुठली शिकवण देणार? असा प्रश्नच उपस्थित करत युवक काँग्रेस आणि एनएसयुआयने प्रा. सौमित्र यांच्या अमरावती येथील नियुक्तीला विरोध करीत जानेवारी महिन्यात आंदोलनही केले होते. मात्र या आंदोलनाचा कुठलाही परिणाम झाला नव्हता. ऑक्टोंबर 2020 मध्ये सौमित्र यांची नियुक्ती अमरावतीत झाली. यापूर्वी ते मध्ये प्रदेशमध्ये भाजपाचे प्रवक्ते होते. फेसबुकवर महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर त्यांना भाजपातून निलंबित करण्यात आले. 2013 मध्ये भाजपाचे मुखपत्र चरैवेतीचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.