भरतपूर -जिल्ह्यातील मेवात भागातील ठग देशभरात फसवणुकीच्या घटना घडवत आहेत. आता मेवातच्या ठगांनी शिवसेनेच्या आमदारासोबत सेक्स चॅट करून ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आमदाराच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलीस भरतपूरला पोहोचले आणि स्थानिक पोलिसांनी मिळून आरोपीला सिक्री भागातील एका गावातून अटक केली.
व्हिडिओ कॉलवरून केली Sex Chat -
सिक्री ठाण्याचे प्रभारी पूरन चंद यांनी सांगितले की, महाराष्ट्रच्या साइबर क्राइम ब्रांच (Cyber Crime Branch) चे एसआई राहुल खेतरे, एसआई गणेश सिरके, कांस्टेबल दीपक पाडलकर आणि अनिल वारे हे भरतपूर ला गेले होते. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना एक व्हिडिओ कॉल आला होता. त्यावरून Sex Chat करून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता.
साइबर क्राइम टीम भरतपूर साक्रीसाठी रवाना -