रीवा -मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील अतरैला पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. 1 जून) एक मोठी दुर्घटना घडली. तामस नदीत बोट उलटल्याने नाविकासह ५ जण बुडाले. नाविक आणि अन्य एका व्यक्तीने नदीत पोहून आपला जीव वाचवला. मात्र, इकर तीन तरुण बेपत्ता झाले. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून स्थानिक शोधमोहीम सुरू केली. मात्र, बेपत्ता तरुणांचा पत्ता लागला नाही. गुरुवारी (दि. 2 जून) सकाळी पुन्हा एकदा नदीत रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येणार आहे.
तामस नदीत बोट उलटली, तिघे बेपत्ता नदीच्या मध्यभागी बुडाली बोट- सत्यम केवट (वय 19 वर्षे ), पवनकुमार केवट (वय 20 वर्षे ) आणि रमाशंकर केवट ( वय 18 वर्षे ) हे तीन तरुण तामस नदी ओलांडून गुरगुडा गावात निमंत्रणासाठी जात होते. नदी बोटीत तीन भावांव्यतिरिक्त खलाशी आणि आणखी एक तरुण बसले होते. बोट नदीच्या मधोमध आल्यावर अचानक हेलकावे मारू लागली. त्यादरम्यान सर्वांचा तोल गेला आणि सर्व लोक खोल पाण्यात पडले. खलाशी आणि आणखी एक तरुण पोहत नदी ओलांडून पलीकडे गेले. पण, इतर तिघे बेपत्ता झाले.
गावात जाण्यासाठी दोनच मार्ग- गुरगुडा गावात जाण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत. पहिल्या वाटेने 40 किलोमीटर जंगलातून प्रवास करावा लागतो, जिथे वन्य प्राण्यांच्या धोका असतो. दुसरा नदीचा मार्ग हा जवळ आहे. मात्र, तो अत्यंत धोकादायक आहे. येथे लोक अनेकदा धोकादायक आणि खोल तामस नदी ओलांडतात आणि लहान बोटीच्या सहायाने जीव धोक्यात घालून ती ओलांडून गुरगुडा गावात पोहोचतात. तिन्ही भावांनी जवळ असल्यामुळे तामस नदीतून बोटीने गुरगुडा गावात जाण्याचा मार्गही निवडला.
युवकाचा सुगावा लागू शकला नाही - अपघातानंतर नाविक व अन्य एका तरुणाने जीव वाचवून नदीतून बाहेर पडून घटनेची माहिती नागरिकांना दिली. लोकांनी पोलिसांना कळवले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. पोलिसांनी शोधमोहीम राबवली. मात्र, बराच शोध घेऊनही तरुणाचा पत्ता लागला नाही. नंतर रेवा येथून एक पथक बोलावण्यात आले. रात्र झाल्याने व नदीत सुमारे 100 फूट खोल असल्याने बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारी, जिल्हाधिकारी मनोज पुष्प आणि पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांच्यासह पोलिसांचे अनेक पथक घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा -Bitcoin: क्रिप्टोकरन्सी जूनमध्ये काही नफा काही तोट्यासह सुरू